November 10, 2024 1:37 PM November 10, 2024 1:37 PM

views 7

यंदाच्या खरीप हंगामात शुक्रवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार, केंद्र सरकारनं केली १२० लाख मेट्रीक टन भाताची खरेदी

यंदाच्या खरीप हंगामात शुक्रवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार, केंद्र सरकारनं, १२० लाख मेट्रीक टन भाताची खरेदी केली आहे. त्यामुळे पंजाबमधे साडेसहा लाखांहून अधिक शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतीचा २७ हजार ९९५ कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, अ श्रेणीच्या धानासाठी निर्धारीत २३२० रुपये प्रति क्विंटल दरानं किमान आधारभूत किंमतीनं खरेदी केली जात आहे. केंद्र सरकारनं येत्या महिनाअखेरीपर्यंत यंदाच्या खरीप हंगामात १८५ लाख मेट्रीक टन भारतखरेद...

October 5, 2024 9:09 PM October 5, 2024 9:09 PM

views 11

मूग, उडीद, सोयाबीन या तिन्ही उत्पादनांच्या प्रत्यक्ष खरेदीला येत्या १० तारखेपासून सुरुवात

राज्य सरकारनं खरीप हंगाम २०२४-२५ करता आधारभूत खरेदीसाठी निश्चित केलेल्या हमीभावानुसार  मूग, उडीद आणि  सोयाबीन खरेदीची नोंदणी सुरु असून या तिन्ही उत्पादनांच्या प्रत्यक्ष खरेदीला येत्या १० तारखेपासून सुरुवात होणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यातल्या नजीकच्या नाफेड खरेदी केंद्रावर आवश्यक त्या कागदपत्रांसह नोंदणी करावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

July 16, 2024 12:48 PM July 16, 2024 12:48 PM

views 8

राज्यात खरीपाच्या पेरण्यांना वेग

राज्यातही समाधानकारक पाऊस झाल्यानं खरीपाच्या पेरण्यांना वेग आला आहे.नाशिक जिल्ह्यात खरीपाच्या 70 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात खरीपाचं क्षेत्र 6 लाख 41 हजार हेक्टर आहे; त्यापैकी 4 लाख 55 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्यानं जिल्ह्यात सर्वत्र भात रोपणीच्या कामांना वेग आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे.

July 16, 2024 9:18 AM July 16, 2024 9:18 AM

views 13

देशात यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत ५० कोटी ७५ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पिकांची पेरणी

देशात यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत ५० कोटी ७५ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पिकांची पेरणी झाली आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार ६२ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कडधान्य, एक कोटी ४० लाख हेक्टर क्षेत्रावर तेलबिया, तर एक कोटी १५ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर भात लावणी झाली आहे. या तिन्ही प्रकारांमधल्या पिकांच्या पेरणीचं क्षेत्रं गेल्यावर्षीपेक्षा वाढलं आहे.  

July 1, 2024 6:42 PM July 1, 2024 6:42 PM

views 3

धाराशिव जिल्ह्यातल्या खरीप हंगामाच्या ८५ टक्के पेरण्या पूर्ण

यंदा पावसानं जूनच्या पहिल्या आठवड्यातच हजेरी लावल्यामुळं धाराशिव जिल्ह्यातल्या खरीप हंगामाच्या ८५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यापैकी सोयाबीनच्या पिकासाठी सर्वाधिक क्षेत्रावर पेरण्या करण्यात आल्या आहेत. पेरण्या करण्यात आलेल्या अन्य पिकांमध्ये मूग, उडीद, तूर, मका यांसारख्या पिकांचा समावेश आहे. गेल्या ४-५ दिवसात उघडीप दिलेल्या पावसानं काल पुन्हा हजेरी लावल्यामुळं उगवण्याच्या बेतात असलेल्या पिकांना जीवदान मिळालं असून दुबार पेरणीचं संकट टळलं आहे.

June 18, 2024 5:39 PM June 18, 2024 5:39 PM

views 14

खरीप हंगामासाठी पीक विमा भरण्यास सुरुवात

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत यावर्षीच्या खरीप हंगामासाठी पीक विमा भरण्याची सुरुवात आज झाली. शेतकऱ्यांना यावर्षी देखील पीक विमा भरण्यासाठी केवळ १ रुपया द्यावा लागणार आहे, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. विमा काढण्याची अंतिम मुदत १५ जुलै असून  शेतकऱ्यांनी त्यापूर्वी  पीक विमा भरून घ्यावा, असं आवाहन कृषिमंत्र्यांनी केलं आहे. खरीप हंगामासाठी  भात, ज्वारी, सोयाबीन,कापसासह एकूण १४ पिकांचा विमा योजनेत समावेश  करण्यात आला आहे.