September 24, 2024 1:13 PM September 24, 2024 1:13 PM

views 8

यंदा देशभरात ११ कोटी ४ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी

यंदा देशभरात ११ कोटी ४ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली आहे. त्यापैकी ४ कोटी १३ लाख हेक्टर क्षेत्र भाताच्या पिकाखाली असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.    यंदा कडधान्याच्या क्षेत्रात वाढ झाली असून १ कोटी २८ लाख हेक्टर क्षेत्रावर कडधान्याची लागवड झाली आहे. १ कोटी ९२ लाख हेक्टरवर तृणधान्य, तर १ कोटी ९३ लाख हेक्टरवर गळीत पिकांची पेरणी झाली आहे. ५७ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर ऊसाची लागण झाली आहे.

July 8, 2024 8:05 PM July 8, 2024 8:05 PM

views 3

खरीप पिकांच्या लागवडीच्या क्षेत्रात यंदाच्या हंगामात गेल्या वर्षीच्या तुलनेत ४७ लाख हेक्टरनं वाढ

खरीप पिकांच्या लागवडीच्या क्षेत्रात यंदाच्या हंगामात गेल्या वर्षीच्या तुलनेत ४७ लाख हेक्टरनं वाढ झाली आहे. खरीप लागवडीखालचं क्षेत्र गेल्या वर्षी ३३१ लाख हेक्टर इतकं होतं, यंदा ते वाढून ३७८ हेक्टर इतकं झालं आहे. यापैकी ६० लाख हेक्टर क्षेत्रावर भाताची, तर ३६ लाख हेक्टर क्षेत्रात डाळींची लागवड करण्यात आली असल्याचं कृषी मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत दिसत आहे.