October 18, 2024 8:51 PM October 18, 2024 8:51 PM

views 3

पेट्रोलियम क्षेत्रातल्या रसायनांच्या उत्पादनांची बाजारपेठ पुढच्या वर्षी ३०० अब्ज डॉलरपर्यंत पोचेल – खनिज तेल मंत्री हरदीप पुरी

भारतातल्या रासायनिक तसंच पेट्रोलियम क्षेत्रातल्या रसायनांच्या उत्पादनांची बाजारपेठ पुढच्या वर्षी ३०० अब्ज डॉलरपर्यंत पोचेल असा ठाम विश्वास खनिज तेल मंत्री हरदीप पुरी यांनी आज दिल्ली इथं व्यक्त केला. सध्या ही बाजारपेठ २२० अब्ज डॉलर इतकी आहे. ते इंडिया केम २०२४ अंतर्गत झालेल्या खनिज तेल विषयक सत्रात बोलत होते.  भारताच्या खनिज तेल क्षेत्राची क्षमता अफाट असून भारतात घेतल्या जाणाऱ्या खनिज तेल उत्पादनांपैकी देशाला दरवर्षी केवळ अडीच ते तीन कोटी टन खनिज तेलाचीच गरज असते. त्यामुळं अधिकचं उत्पादन निर्यात ...