February 7, 2025 3:54 PM

views 18

रत्नागिरीत क्षेत्रीय वैदिक संमेलनाचं आयोजन

आधुनिक काळातल्या ताणतणावाच्या जीवनात स्वास्थ्य मिळवण्यासाठी संस्कृत वाचन आणि पठणातून काही उपाययोजना करता येते का, यावर संशोधन व्हायला हवं, असं मत रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी आज रत्नागिरीत व्यक्त केलं. तीन दिवसांच्या क्षेत्रीय वैदिक संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या संमेलनाला महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून सुमारे १०० प्रतिनिधी उपस्थित आहेत.  

February 6, 2025 3:46 PM

views 14

रत्नागिरीत उद्यापासून क्षेत्रीय वैदिक संमेलनाचं आयोजन

रत्नागिरीत उद्यापासून क्षेत्रीय वैदिक संमेलन होणार असून, त्यात चारही वेदांचं पठण केलं जाणार आहे. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरीतल्या भारतरत्न डॉ. पांडुरंग काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्राने हे संमेलन आयोजित केलं आहे. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात १०० वैदिक मान्यवर सहभागी होणार असून, पाच ठिकाणी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चारही वेदांमधल्या विशिष्ट शाखांचं सामूहिक पारायण तीन दिवसांत केलं जाणार आहे.