February 6, 2025 10:41 AM February 6, 2025 10:41 AM

views 12

क्रीडा विभागाचं कामकाज अधिक वेगाने होण्यासाठी एकात्मिक संगणक प्रणाली विकसित करण्याचे राज्य क्रीडामंत्र्यांचे निर्देश

क्रीडा विभागाचं कामकाज अधिक वेगानं होण्यासाठी एकात्मिक संगणक प्रणाली विकसित करण्याचे निर्देश राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल दिले. यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. अशी प्रणाली विकसित झाल्यावर खेळाडूंना योजनांचा लाभ वेळेत मिळेल. स्पर्धा आणि खेळाडूंच्या कामगिरीचा तपशील या एकत्रित प्रणाली अंतर्गत जतन करता येईल असं भरणे यांनी सांगितलं.

July 9, 2024 3:48 PM July 9, 2024 3:48 PM

views 12

राज्यातल्या अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती

राज्याचं नाव उज्ज्वल करणाऱ्या अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्यासंदर्भात सुधारीत धोरणाचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यात अशा खेळाडूंना प्रामुख्यानं क्रीडा विभागात नियुक्ती देण्याच्या दृष्टीनं त्यांच्या क्रीडा अर्हतेमधे बदल केले आहेत. त्यानुसार ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत समाविष्ट असलेले सर्व खेळ थेट नियुक्तीसाठी पात्र राहतील. संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमातली शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर तरतुदींची पूर्तता करणारे खेळाडू थेट नियुक्तीसाठी पात्र ठरतील. या ...