June 18, 2025 2:13 PM June 18, 2025 2:13 PM
19
क्रिकेट – हर्षित राणा याचा राखीव खेळाडूंमधे समावेश
इंग्लंडविरोधात होणाऱ्या कसोटी क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघात जलदगती गोलंदाज हर्षित राणा याचा राखीव खेळाडूंमधे समावेश झाला आहे. बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं काल रात्री ही घोषणा केली. हर्षित राणाने ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध कसोटी क्रिकेटमधे पदार्पण केलं होतं. त्याने आतापर्यंत दोन कसोटी, पाच एकदिवसीय आणि एक टी ट्वेंटी सामना खेळला आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाचं नेतृत्व शुभमन गिल करणार असून संघात ऋषभ पंत, यशस्वी जायसवाल, के एल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यु ईश्वरन, करुण नायर, नित...