August 4, 2024 7:26 PM August 4, 2024 7:26 PM

views 9

दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेचं भारतापुढं विजयासाठी २४१ धावांचं लक्ष्य

कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेनं भारतापुढं विजयासाठी २४१ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेनं ९ गडी गमावून २४० धावा केल्या. भारतातर्फे वॉशिंग्टन सुंदरनं ३, तर कुलदीप यादवनं २ बळी घेतले.  शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतानं ५ षटकात बिनबाद २९ धावा केल्या होत्या.