October 19, 2025 8:24 PM October 19, 2025 8:24 PM

views 25

चांद्रयान-२ नं साध्य केलं विज्ञान क्षेत्रातलं ऐतिहासिक यश 

चांद्रयान-२ नं आपल्या वैज्ञानिक उपकरणांच्या साहाय्यानं सूर्याच्या पृष्ठभागावरून उत्सर्जित होणाऱ्या ‘कोरोनल मास इजेक्शन’ चा चंद्रावर पडणारा प्रभाव पहिल्यांदाच  टिपला असून, हे विज्ञान क्षेत्रातलं ऐतिहासिक यश असल्याचं इस्त्रो, अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं म्हटलं आहे.  चांद्रयान-२ नं टिपलेल्या नोंदींमुळे चंद्राचं बाह्य क्षेत्र, चंद्रावरचं विरळ वातावरण आणि त्याच्या पृष्ठभागावर होणारा अवकाशातल्या हवामानाचा प्रभाव समजून घ्यायला सहाय्य होईल, असं बंगळुरू इथल्या इस्रोच्या मुख्यालयानं आपल्या निवेदन...