July 31, 2024 3:25 PM July 31, 2024 3:25 PM
13
सांगली जिल्ह्यातल्या वारणा धरणात २९ पूर्णांक २५ टीएमसी पाणीसाठ्याची नोंद
सांगली जिल्ह्यातल्या वारणा धरणात आज सकाळी २९ पूर्णांक २५ टीएमसी पाणीसाठ्याची नोंद झाली असून ३४ पूर्णांक ४० टीएमसी इतकी या धरणाची साठवण क्षमता आहे. कोयना धरणातून ४२ हजार १०० क्यूसेक इतका, वारणा धरणातून ८ हजार ९२ हजार क्यूसेक तर अलमट्टी धरणातून ३ लाख ५० हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू असल्याची माहिती जलसंपदा विभागानं दिली आहे. सांगली जिल्ह्यात काल १५ पूर्णांक ९ दशांश मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक ५३ पूर्णांक ५ दशांश मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.