January 22, 2025 3:54 PM January 22, 2025 3:54 PM
2
केईएम रुग्णालयामध्ये आयुष्मान शताब्दी टॉवर उभे करावेत – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
केईएम रुग्णालय मुंबईकरांचा खऱ्या अर्थाने आधारवड असून त्यांना जागा कमी पडू नये यासाठी केईएम मध्ये आयुष्मान शताब्दी टॉवर उभे करावेत असे असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. ते केईएम रुग्णालयाच्या शतक महोत्सवी समारंभात बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासह केईएमच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत आदी मान्यवर उपस्थित होते. केईएमने घेतलेलं रुग्णसेवेचं व्रत अवघड आहे. आजही इथली रुग्णसेवा अहोरात्र चालू आहे. इथल्या डॉक्टरांचे, नर्सेसचे, कर्म...