October 28, 2024 7:39 PM October 28, 2024 7:39 PM
5
भारत प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत आहे आणि या प्रगतीत तरुणांचा महत्त्वाचा वाटा – केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान
भारत प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत आहे आणि या प्रगतीत तरुणांचा महत्त्वाचा वाटा आहे, असं मत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केलं. ते आज नवी दिल्लीतल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या १३ व्या दीक्षांत समारंभात बोलत होते. नवीन आणि सशक्त राष्ट्र घडवण्याची जबाबदारी तरुणांवर असल्याचं ते म्हणाले. या संस्थेची संशोधन क्षमता वाढवण्यासाठी ४०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणीही त्यांनी केली. दीक्षांत समारंभात विविध विषयांतील एकूण १ हजार ९५४पदवीधरांना पदवी प्रदान करण्यात आली.