February 3, 2025 1:35 PM February 3, 2025 1:35 PM

views 19

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संध्याकाळी संपणार

दिल्ली विधानसभा निवडणूक तसंच उत्तर प्रदेश आणि तमिळनाडूतल्या पोटनिवडणुकीसाठी एक्झिट पोल म्हणजे मतदानोत्तर चाचणीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. येत्या बुधवारी म्हणजेच मतदानाच्या दिवशी सकाळी ७ पासून संध्याकाळी साडेसहापर्यंत हे बंदी आदेश लागू राहतील. त्याचप्रमाणे मतदानापूर्वी ४८ तास प्रसारमाध्यमांना कोणत्याही प्रकारचे ओपिनियन पोल प्रसिद्ध करता येणार नाहीत. या निवडणुकांसाठी प्रचाराची मुदत आज संध्याकाळी संपत आहे. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी तसंच तमिळनाडू आणि उत्तरप्रदेशातल्या प्रत्येक...

October 15, 2024 3:58 PM October 15, 2024 3:58 PM

views 14

केंद्रीय निवडणूक आयोग आज महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकींच्या कार्यक्रमाची करणार घोषणा

महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकींची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोग आज करणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग दुपारी साडेतीन वाजता नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत या दोन्ही राज्यांचं निवडणूक वेळापत्रक जाहीर करेल. त्यानंतर लगेचच आचारसंहिता लागू होईल. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ पुढील महिन्याच्या २६ तारखेला तर झारखंडचा जानेवारीच्या ५ तारखेला संपणार आहे. २०१९मध्ये राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान होऊन २४ ऑक्टोबरला मतमोजणी झाली होती. त्यावेळी ६१ पूर्णांक ४ शतांश टक्के मतदान झाल...

June 18, 2024 7:07 PM June 18, 2024 7:07 PM

views 14

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी येत्या १२ जुलैला निवडणूक

विधानपरिषदेच्या रिक्त होणाऱ्या ११ जागांसाठीच्या निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगानं आज केली. विधानसभेच्या आमदारांकडून या सदस्यांची निवड होणार आहे.  या निवडणुकीची अधिसूचना २५ जून रोजी जारी होणार असून २ जुलैपर्यंत अर्ज भरता येतील. ३ जुलैला अर्जांची छाननी होईल आणि ५ जुलैपर्यंत अर्ज मागे घेता येतील. १२ जुलै रोजी सकाळी ९ ते ४ दरम्यान मतदान होऊन त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता मतमोजणी होईल.  मनीषा कायंदे, विजय गिरकर, अब्दुल्ला दुर्राणी, निलय नाईक, अनिल परब, रमेश पाटील, रामराव पाटील, वजाहत मिर्झा...