April 17, 2025 3:21 PM April 17, 2025 3:21 PM
4
विद्यार्थ्यांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्याबद्दल कोचिंग क्लासेसना दंड
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने आय आय टी - जे इ इ , नीट आणि इतर स्पर्धापरीक्षांचं प्रशिक्षण देणाऱ्या काही कोचिंग क्लासेसना विद्यार्थ्यांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्याबद्दल नोटीस बजावली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या स्पर्धा परीक्षांच्या निकालांनंतर प्रसिद्ध झालेल्या कोचिंग क्लासेसच्या जाहिरातींमध्ये ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत येणाऱ्या नियमांचं पालन केलं नसल्याचं प्राधिकरणाला आढळून आल्यामुळे या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. कोचिंग क्लासेसनी आपल्या जाहिरातींमध्ये परीक्षेत यशाची खात्...