April 15, 2025 11:14 AM April 15, 2025 11:14 AM

views 12

न्याय प्रणाली जनकेंद्री आणि वैज्ञानिक बनवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नरत, केंद्रीय गृहमंत्र्यांची माहिती

केंद्र सरकार देशातली न्याय प्रणाली जनकेंद्री आणि वैज्ञानिक बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचं प्रतिपादन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. नवी दिल्ली इथं आयोजित अखिल भारतीय न्यायवैद्यक शिखर परिषदेत ते काल बोलत होते. सरकार कालबद्ध रितीनं योग्य न्याय देण्याच्या दिशेनं प्रयत्नरत असल्याचं शहा म्हणाले.  

April 1, 2025 2:22 PM April 1, 2025 2:22 PM

views 1

नक्षलमुक्त भारताच्या दिशेनं सरकार मोठं पाऊल उचलत असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन

नक्षलमुक्त भारताच्या दिशेनं सरकार मोठं पाऊल उचलत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. देशात आधी बारा जिल्हे नक्षली कारवायांनी ग्रासले होते, ते सहावर आणण्यात सरकारला यश आल्याचं गृहमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमधे सांगितलं. नक्षल चळवळीविरोधात कठोर कारवाई करत सशक्त, सुरक्षित आणि समृद्ध भारताची निर्मिती सरकार करत आहे. ३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षल चळवळ भारतातून समूळ नष्ट होईल, असं गृहमंत्री म्हणाले.

February 11, 2025 1:37 PM February 11, 2025 1:37 PM

views 8

सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी केंद्रसरकार चौफेर प्रयत्न करीत असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन

सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार चौफेर प्रयत्न करत असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केलं. नवी दिल्ली इथे सायबर सुरक्षा आणि सायबर गुन्हे या विषयावर गृहमंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. सायबर गुन्ह्यांनी भौगोलिक सीमा पुसून टाकल्या असून त्यांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकार अभिसरण, समन्वय, संवाद आणि क्षमता यांच्यावर भर देत असल्याचं शहा यावेळी म्हणाले.   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश डिजिटल क्रांतीचा साक्षीदार ...

February 4, 2025 10:23 AM February 4, 2025 10:23 AM

views 4

जम्मू आणि काश्मिरच्या सुरक्षेबाबत केंद्रीय गृहमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज दिल्लीत जम्मू आणि काश्मिरच्या सुरक्षेबाबत आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीला जम्मू काश्मिरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, गृहसचिव गोविंद मोहन तसंच केंद्रीय गुप्तचर संस्थांचे प्रमुख तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहाण्याची अपेक्षा आहे.

January 7, 2025 10:37 AM January 7, 2025 10:37 AM

views 9

केंद्रीय अन्वेषण विभागाने विकसित केलेल्या भारतपोल पोर्टलचा आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार प्रारंभ

केंद्रीय अन्वेषण विभागानं विकसित केलेल्या भारतपोल पोर्टलचा प्रारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत होणार आहे. आंतरराष्ट्रीय सहाय्यासाठी येणाऱ्या सर्व विनंत्यांची इंटरपोलद्वारे प्रक्रिया सुविहित करण्याचं काम भारतपोल पोर्टल च्या माध्यमातून करण्यात येईल. त्यामध्ये रेड नोटिस जारी करण्यासह इतर नोटिसांचा समावेश आहे. सर्वांसाठी सुरक्षित भारत निर्माण करण्याच्या मोदी सरकारच्या संकल्पनेची पूर्तता करण्यासाठी या पोर्टलमुळे भारतीय तपास यंत्रणांना जगभरात जागतिक पोहोच वाढवता येणार असल्...

October 27, 2024 2:00 PM October 27, 2024 2:00 PM

views 8

भारत-बांगलादेश सीमेवरील पेट्रापोल या लँडपोर्टवर उभारलेल्या ‘मैत्रीद्वार’ प्रवेशद्वाराचं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

गेल्या दहा वर्षात भूमीबंदरांचा जो विकास झाला आहे, त्यामुळे  शेजारी देशांमधल्या भाषा, संस्कृती आणि  साहित्य यांच्यामधील आदानप्रदानात भर पडत आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सांगितलं. पश्चिम बंगालमध्ये पेत्रापोल या भारत-बांगलादेश सीमेवरील पेट्रापोल या लँडपोर्टवर उभारलेल्या ‘मैत्रीद्वार’ या प्रवेशद्वाराचं तसंच प्रवासी टर्मिनल इमारतीचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज झालं, त्य़ावेळी ते बोलत होते. लँडपोर्ट ॲथॉरिटीचे काम हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या  समृद्धी, श...