June 20, 2025 2:17 PM June 20, 2025 2:17 PM

views 12

केंद्रीय गृहमंत्री आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने आयोजित राष्ट्रीय परिसंवादात होणार सहभागी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्तानं आयोजित राष्ट्रीय परिसंवादात सहभागी होणार आहेत. तसंच महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरच्या नव्या मुख्यालयाचं उद्घाटनही शहा यांच्या हस्ते आज होणार आहे. अमित शहा यांनी काल बेंगळुरूमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांची भेट घेतली. आदिचुंचनागिरी विद्यापीठाच्या बेंगळुरू इथल्या संकुलाचं उद्घाटन आज शहा यांच्या हस्ते झालं.

June 20, 2025 9:59 AM June 20, 2025 9:59 AM

views 7

केंद्रीय गृहमंत्र्यांनी बेंगळुरूमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांची घेतली भेट

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल बेंगळुरूमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांची भेट घेतली. आज शाह आदिचुंचनागिरी विद्यापीठाच्या बेंगळुरू इथल्या संकुलाचं उद्घाटन करतील. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज महाराष्ट्राच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मुंबईत आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने आयोजित राष्ट्रीय परिसंवादात ते सहभागी होणार आहेत. तसेच यशवंतराव चव्हाण सेंटर इथ आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री आणि अग्रिकल्चर...

January 16, 2025 1:48 PM January 16, 2025 1:48 PM

views 13

केंद्रीय गृहमंत्री आज देशातल्या सात विमानतळांवरच्या जलदगती इमिग्रेशन यंत्रणेचं करणार उद्घाटन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद, कोचिन आणि अहमदाबाद विमानतळांवर जलदगती इमिग्रेशन यंत्रणेचं उद्घाटन करणार आहेत. या यंत्रणेमुळे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या इमिग्रेशन सुविधा मिळणार आहेत, त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवास सहज आणि विनाअडथळा होण्यासाठी मदत होणार आहे. या यंत्रणेनुसार प्रवाशांना ftittp.mha.gov.in या संकेतस्थळावर त्यांचे तपशील भरावे लागतील आणि आवश्यक कागदपत्रं अपलोड करावी लागतील. नोंदणीकृत प्रवाशांचे बायोमेट्रिक तपशील परदेशी विभागीय नोंदणी कार्यालयांम...

October 15, 2024 10:04 AM October 15, 2024 10:04 AM

views 15

केंद्रीय गृहमंत्री आज नवी दिल्लीत भारतीय पोलीस सेवेतील प्रशिक्षणार्थीं अधिकाऱ्यांशी साधणार संवाद

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्लीत भारतीय पोलीस सेवेतील प्रशिक्षणार्थीं अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. हे प्रशिक्षणार्थी अधिकारी त्यांचे प्रशिक्षण काळातील अनुभव गृहमंत्र्यांना सांगणार आहेत. तर देशाच्या अंतर्गत सुरक्षेपुढील आव्हानांना कशाप्रकारे तोंड देता येईल याचं अमित शहा त्यांना मार्गदर्शन करतील. भारतीय पोलीस सेवेच्या 2023 च्या तुकडीत 54 महिला अधिकाऱ्यांसह एकंदर 188 अधिकाऱ्यांचा समावेश आहे.