June 20, 2025 3:32 PM

views 20

भारताच्या मातीत हजारो वर्षांपासून सहकाराची भावना आहे, केंद्रीय कृषिमंत्र्यांचं प्रतिपादन

संयुक्त राष्ट्रांतर्फे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आज साजरं होत असलं, तरी भारताच्या मातीत हजारो वर्षांपासून सहकाराची भावना आहे. विश्वकल्याणाची भावना भारताच्या नसानसांत आहे आणि हाच सहकाराचा मंत्र आहे, असं प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज केलं. आंतरराष्ट्रीय सहकार्य वर्षाच्या निमित्ताने आयोजित राष्ट्रीय परिसंवादात ते आज मुंबईत बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात शेतीचं उत्पन्न वाढवणं, शेतीशी संलग्न विविध उद्योगांद्वारे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवणं, तसंच शाश्वत ...