September 27, 2024 2:42 PM

views 25

मंकी पॉक्सचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीनं मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना जारी

मंकी पॉक्स आजारासंबंधी जनजागृतीसाठी आवश्यक पावलं उचलावी असं केंद्रीय  आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयानं सर्व राज्यसरकारं आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनांना सांगितलं आहे. मंकी पॉक्सचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीनं मंत्रालयाने सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यात चाचणीसाठी कार्यरत प्रयोगशाळांची यादीही दिली आहे. संसर्ग रोखणे, उपचारांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देणे, आवश्यक तिथे विलगीकरणाच्या सोयी उपलब्ध करुन देणे या गोष्टींची काळजी घ्यावी. राज्यात या विषाणूच्या प्रादुर्भाव- प्...

July 3, 2024 8:20 PM

views 10

महाराष्ट्रात झिका विषाणू प्रकरण पाहता केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाची मार्गदर्शक नियमावली जारी

महाराष्ट्रात काही ठिकाणी झिका विषाणूंचा संसर्ग झालेले रुग्ण आढळल्यानंतर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयानं सर्व राज्यांना मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे. महाराष्ट्रात 2 जुलैपर्यंत पुण्यात सहा तर कोल्हापूर आणि संगमनेर इथं प्रत्येकी एक अशा एकूण आठ झिकासंक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांनी झिका विषाणू संसर्गासंदर्भात अधिक दक्षता बाळगावी असे निर्देश मंत्रालयानं दिले आहेत. विशेषतः झिका संक्रमित गर्भवती मातांची तपासणी आणि गर्भाच्या वाढीवर देखरेख ठेवावी आणि केंद...