August 19, 2024 7:39 PM August 19, 2024 7:39 PM

views 6

बीड जिल्ह्यात पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन

राज्याच्या कृषी विभागातर्फे २१ ऑगस्ट पासून बीड जिल्ह्यात परळी वैद्यनाथ इथं पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी काल या महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला. या कृषी महोत्सवात भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, पशुप्रदर्शन त्याचबरोबर राज्यभरातल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शक अशा अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते, तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अज...