June 21, 2024 7:55 PM June 21, 2024 7:55 PM
18
केंदीय कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रासह १० राज्यांच्या कृषी मंत्र्यांची आणि अधिकाऱ्यांची एकत्रित परिषद
केंद्र सरकारच्या धोरणानुसार डाळीच्या उत्पादनात आणखी वाढ करण्यासाठी राज्यात कृषी विद्यापीठातलं संशोधन, प्रगत शेती, सुधारित वाणांचा तसंच पाणी आणि खत वापराचं सुयोग्य नियोजन केलं जाईल, असं कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज सांगितलं. देशात डाळींच्या उत्पादनात आत्मनिर्भरता मिळवण्यासाठी काय काय करता येईल याविषयी केंदीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रासह १० राज्यांच्या कृषी मंत्र्यांची आणि अधिकाऱ्यांची एकत्रित परिषद दूरदृश्य प्रणालीद्वारे झाली. त्यात महाराष्ट्राची बाजू मांडतान...