February 11, 2025 3:39 PM

views 15

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह कृत्रिम बुद्धिमत्ता कृती शिखर परिषदेचं सहअध्यक्षपद भूषवणार

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरातून नवसंशोधन आणि त्याचं नियमन यावर जागतिक पातळीवर चर्चा करण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. पॅरिसमध्ये आयोजित कृत्रिम बुद्धिमत्ता कृती शिखर परिषदेत सहअध्यक्षपदावरुन ते बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्तेचे चांगले उपयोग खूप आहेत. मात्र त्याचवेळी त्यातून होणाऱ्या दुजाभावावर लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.  फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन या परिषदेत सहअध्यक्ष झाले आहेत. या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी भारत-फ्रान्स द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याच्...