June 29, 2024 6:42 PM June 29, 2024 6:42 PM
9
शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना पदावरून हटवलं
शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना पदावरून हटवण्यात आलं आहे. पक्षानं निवेदनाद्वारे या संदर्भात माहिती दिली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खांडे यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांना मदत केल्याची ध्वनिचित्रफीत व्हायरल झाली होती. तसंच त्यांना एका मारहाण प्रकरणात अटक झाली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षानं खांडे यांच्यावर कारवाई केली आहे.