October 8, 2024 9:34 AM October 8, 2024 9:34 AM

views 9

महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांत संविधान भवन उभारणार असल्याची केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची घोषणा

आगामी काळात महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांत संविधान भवन उभारणार असल्याची घोषणा केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत केली. विरोधक संविधानाबद्दल सामान्य नागरिकांची दिशाभूल करत आहेत. नागरिकांच्या मनातला हा संभ्रम दूर व्हावा, याकरता संविधान भवनाच्या माध्यमातून वास्तव स्थितीची माहिती करून देण्यात येईल असं रिजिजू म्हणाले. केंद्र आणि राज्य सरकारच्या आर्थिक सहकार्यातून उभारण्यात येणाऱ्या या संविधान भवनातून अल्पसंख्याक वर्गाच्या समस्यांचा निपटारा करण्यात येईल, तसंच ...

July 25, 2024 1:46 PM July 25, 2024 1:46 PM

views 7

विरोधकांनी जनादेशाचा अपमान केल्याची संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांची टीका

विरोधी पक्षाच्या नेत्यांनी देशानं दिलेल्या जनादेशाचा अपमान केल्याची टीका संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज केली. ते आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेला संबोधित करत होते. अर्थसंकल्पावर अर्थपूर्ण चर्चा अपेक्षित असून, काही पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सभागृहाच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचल्याचं ते यावेळी म्हणाले. विरोधी पक्षांनी अर्थसंकल्पावर कोणतंही भाष्य न करता, केवळ राजकारण केल्याचा आरोप त्यांनी केला.

June 17, 2024 12:37 PM June 17, 2024 12:37 PM

views 35

मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खडगे यांची घेतली भेट

केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी काल काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खडगे यांची भेट घेतली. संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आली.या अधिवेशनात सर्व पक्षांनी मिळून देशाच्या विकासासाठी काम करू असं प्रतिपादन उभय नेत्यांनी या भेटीत केलं. १८ व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन येत्या २४ जून पासून सुरू होणार असून ते ३ जुलै पर्यन्त चालेल. या अधिवेशनात नवीन सदस्यांचा शपथविधी तसंच नवीन अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे.

June 15, 2024 1:18 PM June 15, 2024 1:18 PM

views 11

अधिवेशनात सर्व राजकीय पक्ष मिळून विधायक कामकाज करतील – मंत्री किरेन रिजिजू

१८व्या लोकसभेचं अधिवेशन येत्या २४ जून पासून सुरु होत असून अधिवेशनात सर्व राजकीय पक्ष मिळून विधायक कामकाज करतील अशी आशा केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केली आहे. संसदेची प्रतिष्ठा आणि सन्मान राखण्याच्या कामी सर्व सदस्य सहकार्य करतील अशी अपेक्षा त्यांनी समाजमाध्यमावर दिलेल्या संदेशात व्यक्त केली आहे. या अधिवेशनात सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी होईल. राज्यसभेचं अधिवेशन २७ जूनपासून सुरु होणार असून दोन्ही सभागृहांच्या  संयुक्त बैठकीसमोर राष्ट्रपतींचं अभिभाषण होईल. आधिवेशन ...