October 20, 2024 6:18 PM October 20, 2024 6:18 PM

views 8

काश्मीर खोऱ्यात उरी भागातल्या नियंत्रण रेषेजवळ सुरक्षा दलं आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू

काश्मीर खोऱ्यात बारामुल्ला जिल्ह्याच्या उरी भागातल्या नियंत्रण रेषेजवळ सुरक्षा दलं आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. श्रीनगरमधे नियुक्त लष्कराच्या चिनार तुकडीने याबाबतचं वृत्त समाजमाध्यमांवर टाकलं आहे. या भागात सुरक्षा दलांना घुसखोरी होत असल्याच्या संशयास्पद हालचाली दिसल्या होत्या. त्यानंतर ही घुसखोरी रोखण्यासाठी लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त मोहीम सुरू केली. ही मोहीम सुरु असतानाच दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला, सुरक्षा दलानंही त्याला चोख प्रत्यूत्तर दिलं. शेवटचं वृत्त हाती ये...

June 21, 2024 8:06 PM June 21, 2024 8:06 PM

views 7

काश्मीरमध्ये लवकरच उभारणार महाराष्ट्र सदन

काश्मीरमध्ये लवकरच महाराष्ट्र सदन उभारण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागानं घेतला आहे. यासाठी जमीन खरेदी करण्यासाठी विभागानं ९ कोटी ३० लाख २४ हजार रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.  जम्मू आणि काश्मीर सरकारनं बडगाम जिल्ह्यातल्या इच्चगाम तालुक्यात अडीच एकर जमीन महाराष्ट्र सदनाच्या वास्तूसाठी प्रदान केली आहे. आता सदनाच्या वास्तूचं स्वरूप, त्यातल्या सोयी-सुविधा आणि आराखड्याची प्रक्रिया सुरू होईल. त्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात हो...