August 11, 2024 7:25 PM August 11, 2024 7:25 PM
20
विरोधकांच्या अपप्रचारामुळे भाजपाच्या जागा घटल्या, पण जनाधार घटला नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांचं मत
लोकसभा निवडणुकीच्या वेळी विरोधकांनी अपप्रचार केल्यानं भाजपाच्या जागा कमी आल्या, पण आपला जनाधार कमी झालेला नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. ते आज अकोल्यात भाजपाच्या जिल्हा विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते. कुठल्याच बहिणीला लाडकी बहीण योजनेपासून वंचित ठेवण्यात येणार नाही. मात्र या योजनेच्या यशाचा त्रास महाविकास आघाडीला होत आहे ते रोज लाडक्या बहिणीच्या संदर्भात खोटं बोलत आहेत असा आरोपही फडणवीस यांनी यावेळी केला. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आपल्या सरकारन...