April 9, 2025 3:15 PM

views 22

केंद्र सरकारने किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत १०० लाख कापूस गासड्यांची केली खरेदी

केंद्र सरकारने चालू हंगामात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत १०० लाख कापूस गासड्यांची खरेदी केली असून कापूस उत्पादकांना त्यापोटी ३७ हजार ४५० कोटी रुपयांचं वितरण केलं आहे. यात तेलंगणातून सर्वात जास्त ४० लाख गासडी तर महाराष्ट्रातून ३० लाख आणि गुजरातमधून १४ लाख गासडी कापूस खरेदी झाल्याचं सरकारी पत्रकात म्हटलं आहे. भारतीय कापूस महामंडळानं देशभरात ५०८ खरेदी केंद्र सुरु केली असून पारदर्शी व्यवहारांसाठी डिजिटल सेवा सुविधांचा वापर केला आहे.