February 4, 2025 10:58 AM February 4, 2025 10:58 AM

views 8

कांगोमध्ये रवांडा समर्थित बंडखोरांची एकतर्फी युद्धबंदीची घोषणा

कांगोमध्ये रवांडा समर्थित बंडखोरांनी एकतर्फी युद्धबंदीची घोषणा केली. गेल्या आठवड्यात कांगो लष्कर आणि बंडखोरांमध्ये झालेल्या चकमकीत किमान 900 लोकांचा मृत्यू झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. बंडखोरांनी गोमा हे प्रमुख शहर ताब्यात घेतले होते तर बुकावू ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं वृत्त आहे. वांशिक संघर्षामध्ये या युद्धाचे मूळ आहे.

February 3, 2025 10:45 AM February 3, 2025 10:45 AM

views 12

कांगोमधील भारतीय दुतावासाने बुकावूमध्ये राहाणाऱ्या भारतीय नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचा दिला सल्ला

कांगोमधील भारतीय दुतावासाने बुकावूमध्ये राहाणाऱ्या भारतीय नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचा सल्ला दिला आहे. या नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी विमानतळ, सीमामार्ग आणि व्यापारी मार्ग खुले केल्याचं दुतावासानं म्हटलं आहे. भारतीय दुतावासाने कांगोतल्या सुरक्षिततेच्या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे. दुतावासाने भारतीय नागरिकांना सर्व आवश्यक ओळखपत्रे आणि प्रवास दस्तावेज बरोबर बाळगण्याचं आवाहन केलं आहे. तसंच औषधे, कपडे, प्रवास दस्तावेज, खाद्यपदार्थ आणि पाणी यांसारख्या जीवनावश्यक वस्तूदेखील ...