January 22, 2025 10:04 AM January 22, 2025 10:04 AM

views 18

येत्या २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिनी काँग्रेस पक्षाचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

येत्या २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिनी काँग्रेस पक्षानं राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. राज्यात ५० लाख मतं कशी वाढली याची माहिती निवडणूक आयोग देत नाही, म्हणून आम्ही आंदोलन करणार असल्याचं, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी सांगितलं. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात आंदोलन करून, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देणार असल्याची माहिती पटोले यांनी दिली.