June 14, 2024 7:17 PM June 14, 2024 7:17 PM

views 34

काँग्रेस आणि महाविकास आघाडीने जनतेला खोटं बोलून मतं घेतल्याचा चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि महाविकास आघाडीने जनतेला संभ्रमित केलं, तसंच खोटं बोलून मतं घेतली, असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. भाजपाचे नेते आणि कार्यकर्त्यांची बैठक आज मुंबईत झाली. त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. भाजपा संविधान बदलणार असल्याची काँग्रेसने जनतेच्या मनात निर्माण केलेली भिती आपण दूर करु आणि जनतेचा विश्वास संपादित करून विधानसभेची निवडणूक जिंकू, असं ते यावेळी म्हणाले.