October 26, 2024 5:59 PM October 26, 2024 5:59 PM

views 18

उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये काही जागांची अदलाबदल करण्यासंदर्भात चर्चा

उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये काही जागांची अदलाबदल करण्यासंदर्भात आज चर्चा झाली. काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाचे बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली. १८० पेक्षा अधिक जागा लढण्याचं महाविकास आघाडीचं लक्ष्य असल्याचं ते यावेळी म्हणाले. जागावाटपाच्या चर्चा शेवटच्या क्षणापर्यंत चालू असतात, महाविकास आघाडीचे घटक पक्ष मैत्रिपूर्ण लढती करणार नाहीत, असंही थोरात यांनी स्पष्ट केलं.

October 26, 2024 3:28 PM October 26, 2024 3:28 PM

views 18

काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. २३ उमेदवारांच्या यादीत काँग्रेसनं राळेगाव इथून माजी मंत्री वसंत पुरके, सावनेरमधून अनुजा केदार, अर्जुनी-मोरगाव इथून दिलीप बनसोड, जालन्यातून कैलास गोरंट्याल आणि शीव-कोळीवाडा मतदारसंघातून गणेश यादव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं धुळ्यातून अनिल गोटे, हिंगोलीतून रूपाली पाटील, शिवडीतून अजय चौधरी तर भायखळ्यातून मनोज ...

September 30, 2024 7:28 PM September 30, 2024 7:28 PM

views 11

काँग्रेसकडे उमेदवारी मागितलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उद्यापासून घेतल्या जाणार

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडे उमेदवारी मागितलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उद्यापासून घेतल्या जाणार आहेत. प्रदेश काँग्रेसनं इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून १ हजार ६८८ इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. त्याच्या मुलाखतींसाठी काँग्रेसनं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, खासदार चंद्रकांत हंडोरे, प्रणिती शिंदे यांच्यासह  ज्येष्ठ नेत्यांवर विविध जिल्ह्यांची जबाबदारी सोपवली आहे.  हे नेते दिनांक १ ते ८ ॲाक्टो...

August 27, 2024 7:40 PM August 27, 2024 7:40 PM

views 13

छत्रपती महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी काँग्रेसचं आंदोलन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.  कराड इथं चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाालं, त्यावेळी चे बोलत होते. यावेळी काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.    काँग्रेसचे विधानपरिषदेतले गटनेते सतेज पाटील यांनी या किल्ल्याला भेट दे...

August 14, 2024 3:56 PM August 14, 2024 3:56 PM

views 10

राज्यातल्या शेतकरी, गरीब आणि तरुणांना न्याय देणं ही काँग्रेसची भूमिका आहे – नाना पटोले

राज्यातल्या शेतकरी, गरीब आणि तरुणांना न्याय देणं ही काँग्रेसची भूमिका असून विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ते नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं रक्षण करणं ही काँग्रेसची प्राथमिकता असून महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्रीपदी कोण बसेल याचा निर्णय घेतला जाईल, असं पटोले यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर टीका केली. युती सरकार हे महाभ्रष्ट सरकार असून त्यांनी राज्य विकायला का...

July 22, 2024 7:53 PM July 22, 2024 7:53 PM

views 19

मराठा ओबीसी आरक्षणाचा वाद महायुती सरकारनेच पेटवला असल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप

राज्यात मराठा ओबीसी आरक्षणाचा वाद महायुती सरकारनेच पेटवला असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.  २०१४ साली पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, पण त्यानंतर सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर केलं नाही, त्यामुळे तो विफल ठरला, असं त्यांनी सांगितलं. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर विरोधकांनी भूमिका स्पष्ट केली असून सर्वपक्षीय बैठकीत यासंदर्भ...

June 27, 2024 5:36 PM June 27, 2024 5:36 PM

views 13

काँग्रेस नेते विलास राऊत, आसावरी देवतळे आणि विजय देवतळे पक्षातून ६ वर्षांसाठी निलंबित

काँग्रेसचे यवतमाळमधले नेते विलास राऊत आणि चंद्रपूरमधले नेते आसावरी देवतळे आणि विजय देवतळे यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी पक्षविरोधी कारवाई केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशावरून ही कारवाई केल्याचं पक्षाचे नेते नाना गावंडे यांनी सांगितलं.

June 22, 2024 7:28 PM June 22, 2024 7:28 PM

views 25

पाणीपट्टी दरवाढ महाविकास आघाडीच्या काळात झाली असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्याकडून स्पष्ट

राज्य सरकारनं पाणीपट्टीत दहापट वाढ केल्याची बातमी काँग्रेस पसरवत आहे, मात्र ही संपूर्ण दरवाढ महाविकास आघाडीच्या काळात झाली होती, असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिलं आहे. २९ मार्च २०२२ रोजी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने जारी केलेल्या आदेशानुसार, महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातच ही दरवाढ झाली. मात्र शेतकऱ्यांना भूर्दंड पडू नये, यासाठी ही दरवाढ स्थगित करण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे, येत्या आठवड्यातच ते पूर्ण होईल, असं फडनवीस यांनी स्पष्ट केलं.

June 21, 2024 6:21 PM June 21, 2024 6:21 PM

views 19

महायुती सरकारविरोधात काँग्रेसचं राज्यभर ‘चिखल फेको’ आंदोलन

महायुती सरकारविरोधात काँग्रेसनं आज राज्यभरात चिखल फेको आंदोलन केल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. केंद्रातलं आणि राज्यातलं भाजपा आघाडीचं सरकार जनतेला वाऱ्यावर सोडून मजा मारत आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे, महागाई, बेरोजगारीनं लोकांना जगणं कठिण झालं आहे. बियाणं आणि खतांचा काळाबाजार करून शेतकऱ्यांची लूट सुरु आहे. NEET चे पेपर फोडून विद्यार्थ्यांचं भविष्य सरकारनं उद्धवस्त केलं आहे. म्हणून हे आंदेलन केल्याचं पटोले यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगि...