October 19, 2024 11:00 AM October 19, 2024 11:00 AM

views 15

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये भारताच्या दुसऱ्या डावात 3 बाद 231 धावा

न्यूझीलंडविरुद्धच्या बंगळुरू क्रिकेट कसोटीच्या कालच्या तिसऱ्या दिवशी भारतानं दुसऱ्या डावात 3 बाद 231 धावा केल्या. न्यूझीलंडकडे सध्या 125 धावांची आघाडी आहे. भारताकडून विराट कोहली आणि सरफराज खान यांनी प्रत्येकी 70 धावा तर रोहित शर्माने 52 धावा करत भारताचा डाव सावरला. तत्पूर्वी न्यूझीलंडने पहिल्या डावात 402 धावा करून मोठी आघाडी घेतली होती.  

September 30, 2024 7:35 PM September 30, 2024 7:35 PM

views 13

कसोटी क्रिकेट सामन्यात आज चौथ्या दिवशी भारताची बांगलादेशावर २६ धावांची आघाडी

कानपूर इथं सुुरु असलेल्या बांगलादेशाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज चौथ्या दिवशी भारतानं २६ धावांची आघाडी घेतली.  बांगलादेशाचा पहिला डाव आज २३३ धावांवर आटोपला. भारतानं पहिल्या डावात ९ बाद २८५ धावा झाल्या असताना डाव घोषित केला. दुसऱ्या डावात आजचा खेळ थांबला तेव्हा बांगलादेशाच्या २ बाद २६ धावा झाल्या होत्या.

September 28, 2024 8:51 PM September 28, 2024 8:51 PM

views 6

कसोटी क्रिकेट मालिकेतला आजच्या दुसऱ्या दिवशीचा खेळ पावसामुळे रद्द

भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या आणि अंतिम सामन्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशीचा खेळ पावसामुळे रद्द झाला. काल पावसामुळं खेळ थांबला तेव्हा बांग्लादेश  ३ गडी बाद १०७ धावांवर खेळत होता.

September 27, 2024 11:50 AM September 27, 2024 11:50 AM

views 8

भारत-बांगलादेशदरम्यान आजपासून कानपूर इथं दुसरा आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामना

भारत आणि बांगलादेशदरम्यान दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतला दुसरा आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामना आजपासून कानपूर इथं खेळला जाणार आहे. सकाळी साडे नऊ वाजता या सामन्याला सुरुवात होईल. भारत पहिली कसोटी जिंकत मालिकेत एक शुन्यनं आघाडीवर आहे. या सामन्यासाठी पहिल्या कसोटीचा संघ भारतानं कायम ठेवला आहे.