October 9, 2024 2:16 PM October 9, 2024 2:16 PM

views 8

कर्ज देण्याच्या प्रक्रियेत सेवेच्या गुणवत्तेवर परिणाम होणार नाही,याची दक्षता बँकांनी बाळगावी – अर्थमंत्री

बँकांनी नफा मिळवण्याच्या हेतूने कर्ज देण्यापूर्वी जोखीम कमी करण्यावर भर द्यावा आणि सावधतेने कर्जवाटप करावं असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन काल मुंबई इथे एका कार्यक्रमादरम्यान म्हणाल्या. बँक व्यवस्थेचा एकूण अर्थव्यवस्थेवर आणि कुटुंबांच्या आर्थिक स्थैर्यावर थेट परिणाम होत असतो. त्यामुळे कर्ज देण्याच्या प्रक्रियेत सेवेच्या गुणवत्तेवर परिणाम होणार नाही, याची दक्षता बँकांनी बाळगावी अशा सूचनाही सीतारामन यांनी यावेळी केल्या.