February 5, 2025 10:40 AM

views 31

कर्करोगापासून बचाव करण्यासाठी राज्यात जनजागृती आवश्यक असल्याचं, आरोग्य मंत्र्यांचं प्रतिपादन

कर्करोगापासून बचाव करण्यासाठी राज्यात जनजागृती आवश्यक असल्याचं, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ आबिटकर यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. नांदेड जिल्हा रुग्णालयातही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर यांच्या हस्ते जागतिक कर्करोग दिनाच्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. यावेळी तज्ज्ञांकडून कर्करोग आजारासंबंधी मार्गदर्शन करण्यात आलं.  

July 24, 2024 2:41 PM

views 26

कर्करोगावरील औषधांच्या आयात शुल्कात सूट देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

कर्करोगावरची औषधं सहजरित्या उपलब्ध व्हावीत, यासाठी या औषधांच्या आयात शुल्कात सूट देण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी काल केंद्रीय अर्थसंकल्प मांडताना ही घोषणा केली. यात स्तनांच्या कर्करोगासाठी, फुफ्फुसाच्या कर्करोगासाठी आणि पित्तनलिकेच्या कर्करोगासाठी असलेल्या औषधांचा समावेश आहे. देशातल्या २७ लाख कर्करुग्णांना याचा लाभ मिळणार असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे.