June 22, 2024 6:47 PM June 22, 2024 6:47 PM
16
आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांचे उपोषण स्थगित
ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांचं जालना जिल्ह्यातल्या वडीगोद्री इथं सुरू असलेलं उपोषण आज स्थगित करण्यात आलं आहे. सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर वार्ताहर परिषदेत हाके यांनी ही घोषणा केली. आपल्या दोन मागण्या मान्य झाल्या असून मराठा आरक्षणासाठीचा सग्यासोयऱ्यांचा अध्यादेश सर्वपक्षीय बैठक झाल्याशिवाय काढणार नाही, असं आश्वासन आपल्याला सरकारने दिल्याचं लक्ष्मण हाके यांनी सांगितलं. तसंच खोटी कुणबी प्रमाणपत्रं देणारे आणि घेणारे या दोघांवरही कारवाई करण्याचं आश्वासन सरकारने दिल्याचं त्यांन...