October 10, 2024 2:14 PM

views 37

राज्यातल्या १९ जाती तसंच समुदायांचा, ओबीसींच्या केंद्रीय यादीत समावेश करण्यासाठी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची शिफारस

राज्यातल्या १९ जाती तसंच समुदायांचा ओबीसींच्या केंद्रीय यादीत समावेश करण्यासाठी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगानं शिफारस केली आहे. यामध्ये लोढ, लोढा, लोधी, बडगुजर, सूर्यवंशी गुजर, लेवे गुजर, रेवे गुजर, रेवा गुजर, डांगरी, भोयर, पवार, कापेवार, मुन्नार कापेवार, मुन्नार कापू, तेलंगा, तेलंगी, पेंटारेड्डी, बुकेकरी या जाती, तसंच समुदायांचा समावेश आहे.

July 16, 2024 1:15 PM

views 23

मराठा-ओबीसी आरक्षणावरून तणाव निवळण्यासाठी पुढाकार घेण्याचं भुजबळांचं शरद पवारांना आवाहन

मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राज्यात तयार झालेला तणाव निवळण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती आपण त्यांना केल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी काल भेट घेतल्यानंतर भुजबळ पत्रकार परिषदेत बोलत होते.   या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. यामध्ये कोणतंही राजकारण न आणता येत्या दोन दिवसांत आपण या विषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करू, तसंच राज्यातल्या प्रमुख नेत्यांशी चर्चा क...

July 6, 2024 7:09 PM

views 36

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिलं नाही तर राजकीय भूमिका घेण्याचा मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊन शासनानं या समाजाबद्दलची आस्था दाखवून द्यावी अन्यथा आगामी काळात राजकीय भूमिका घेऊ, असा इशारा आज आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दिला. हिंगोली शहरात मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीच्या वेळी ते बोलत होते. यावेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ही रॅली सुरू झाली.  यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त होता.

June 21, 2024 6:57 PM

views 26

राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची घेतली भेट

राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं आज जालना जिल्ह्यात वडीगोद्री इथं ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांची भेट घेतली. यावेळी ओबीसींच्या २९ टक्के आरक्षणाला कुठंही धक्का लागणार नाहीं याबाबत राज्य सरकारनं लेखी आश्वासन द्यावं, आणि मराठा कुणबी म्हणून दिलेली ५७ लाख प्रमाणपत्रं रद्द करावीत, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली. या शिष्टमंडळात मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचा समावेश होता.  यावेळी गिरीश महाजन यांनी हाके यांचं...

June 18, 2024 8:45 AM

views 45

ओबीसी आरक्षण आंदोलकांच्या शिष्टमंडळाची आज राज्य मंत्रिमंडळासोबत बैठक

ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये या मागणीसाठी, जालना जिल्ह्यात वडीगोद्री इथं उपोषणकर्त्या आंदोलकांच्या पाच सदस्यीय शिष्टमंडळ आज राज्य मंत्रिमंडळासोबत बैठक होणार आहे. सरकार या शिष्टमंडळाशी त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करणार आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं काल सकाळी या आंदोलकांची भेट घेत उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, असं लेखी आश्वासन सरकानं द्यावं, अशी मागणी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी केली आहे. राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंड...