July 21, 2024 2:49 PM
17
फ्रान्सच्या ग्रेगोयर जॅक आणि मॅन्युअल गुइनार्ड या जोडीचा सामना ब्राझीलच्या ऑरलँडो लझ आणि राफेल मातोस या जोडीसोबत होणार
स्वीडिश ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या विजेतेपदासाठी आज फ्रान्सच्या ग्रेगोयर जॅक आणि मॅन्युअल गुइनार्ड या जोडीचा सामना ब्राझीलच्या ऑरलँडो लझ आणि राफेल मातोस या जोडीसोबत होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी ३ वाजता ही लढत सुरू होईल. फ्रान्सच्या जोडीनं इक्वेडोर आणि कझाकस्तानच्या अलेक्झांडर आणि गोंझालो यांचा पराभव करून अंतिम फेरी गाठली, तर राफेल नदाल आणि कॅस्पर रुड या जोडीनं माघार घेतल्यानं ब्राझीलच्या जोडीला पुढे चाल मिळून त्यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठ...