June 20, 2025 8:00 PM June 20, 2025 8:00 PM

views 4

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते बिहारमध्ये ५ हजार ९०० कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पण

गेल्या ११ वर्षांत बिहारला समृद्धी आणि विकासाच्या मार्गावर नेणारं राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार हे विकासाचं प्रतीक असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. बिहार इथे सिवानमध्ये एका जाहीर सभेला ते संबोधित करत होते. त्यांनी सिवान इथून ५ हजार ९०० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं दूरस्थ पद्धतीने उद्घाटन आणि पायाभरणी केली. यामध्ये विविध नवीन रेल्वे गाड्यांचा शुभारंभ, प्रधानमंत्री घरकूल योजना, नमामी गंगे योजनेअंतर्गत ६ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचं उद्घाटन इत्यादी विकासकामांचा सम...

November 13, 2024 2:04 PM November 13, 2024 2:04 PM

views 20

नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयातर्फे ओदिशात दोन दिवसीय चिंतन शिबिराचं आयोजन

नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयातर्फे उद्यापासून ओदिशात भुवनेश्वर इथे दोन दिवसीय चिंतन शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरात २०३० पर्यंत ५०० गिगावॅटचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि २०४७ पर्यंत १ हजार ८०० गिगावॅटच्या पुढील उद्दिष्टाच्या धोरणांवर चर्चा होणार आहे. केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन होणार आहे.