December 8, 2024 2:05 PM December 8, 2024 2:05 PM

views 18

ब्रिस्बेन येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघांमध्ये आज ब्रिस्बेन इथं झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतावर १२२ धावांनी विजय मिळवला. या विजयासोबत ऑस्ट्रिलेयानं तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर जॉर्जिया आणि एलिसे यांच्या शतकी खेळींच्या जोरावर निर्धारीत ५० षटकांत ८ बाद ३७१ धावा केल्या. विजयासाठी ३७२ धावांचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ ४४ षटकं आणि ५ चेंडूंमध्ये २४९ धावा करू...

June 18, 2024 3:12 PM June 18, 2024 3:12 PM

views 38

टी २० विश्वचषक स्पर्धेतले सुपर ८ देश निश्चित

टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत सुपर ८ संघ निश्चित झाले आहेत. सुपर ८ च्या पहिल्या गटात भारत, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि अफगाणिस्तान तर दुसऱ्या गटात अमेरिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश आहे. सुपर ८ फेरीतला पहिला सामना उद्या अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेत खेळला जाईल. तर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात २० मे रोजी सामना होणार आहे. दोन्ही गटातल्या प्रत्येकी दोन सर्वोत्तम संघांना उपांत्य फेरीत प्रवेश मिळणार आहे.