November 6, 2024 10:13 AM November 6, 2024 10:13 AM

views 3

राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी आता अंतिम टप्प्यात

राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी काल मुंबईत निवडणुकीच्या तयारीविषयी माहिती दिली.  ‘‘राज्यात मतदारांच्या संख्येच्या प्रमाणात मतदान केंद्राच्या संख्येत वाढ केली असून, एकूण एक लाख १८६ मतदान केंद्र असल्याचं चोक्कलिंगम यांनी सांगितलं. यामध्ये शहरी मतदान केंद्र ४२ हजार ६०४, तर ग्रामीण मतदान केंद्र ५७ हजार ५८२ इतकी आहेत. शहरी भागातल्या मतदारांची अनास्था विचारात घेऊन शहरी भागातल्या मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावं, यासाठी राज...

November 6, 2024 9:17 AM November 6, 2024 9:17 AM

views 22

मतदार जागृतीसाठी राबविली जाणार विशेष मोहीम – एस.चोक्कलिंगम

विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होत असून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी सर्व विभागांनी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या जनजागृतीच्या मोहिमेत सहभागी व्हावं असं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी काल मुंबईत केलं. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक काल त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली; त्यावेळी ते बोलत होते. मतदार जागृतीसाठी येत्या आठ तारखेपासून मतदानाच्या दिवसापर्यंत विशेष मोहीम राबविली जाणार आहे, असं त्यांनी सांगितलं. निवडणूकीसाठी यंत्रणेची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचं...

October 27, 2024 7:09 PM October 27, 2024 7:09 PM

views 10

वार्ताहरांनी बातमीची निष्पक्षता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवावी- मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

वार्ताहरांनी बातमीची निष्पक्षता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवावी, असं आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केलं. आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागाच्या वतीने आयोजित  अंशकालीन वार्ताहरांची कार्यशाळेत मुंबईत ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून माहिती प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम विभागाच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा उपस्थित होत्या. राज्याचे अतिरीक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी, महाराष्ट्र सायबर पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांनी यावेळी मार्गदर्शन केलं.