June 22, 2024 6:44 PM June 22, 2024 6:44 PM

views 13

एन टी ए परीक्षा प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी उच्चस्तरीय तज्ञ समितीची स्थापना

एन टी ए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा पारदर्शी, सहज आणि योग्य वातावरणात पार पडाव्यात यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं उच्चस्तरीय तज्ञ समितीची स्थापना केली आहे. इस्रोचे माजी अध्यक्ष डॉक्टर के राधाकृष्णन या सात सदस्यीय समितीचे अध्यक्ष असतील. कार्यक्षमता वाढवून एन टी ए च्या चुकीच्या पद्धती मोडून काढत  परीक्षा प्रक्रियेत सुधारणा, संकलित माहिती सुरक्षा तसंच संस्थेची रचना आणि कामकाज याची समीक्षा समिती करणार आहे. एन टी ए च्या कामकाजाचं मूल्यांकनही समिती करणार आ...