April 17, 2025 10:44 AM April 17, 2025 10:44 AM
5
मध्य रेल्वेने मुंबई मनमाड पंचवटी एक्स्प्रेस गाडीत बसवलं एटीएम यंत्र
मध्य रेल्वेनं मुंबई मनमाड पंचवटी एक्स्प्रेस गाडीत एटीएम यंत्र बसवलं आहे. चालत्या रेल्वेत एटीएमची सुविधा देण्याचा रेल्वेचा हा पहिलाच प्रयत्न आहे. या सुविधेच्या तांत्रिक व्यवहार्यतेचं मूल्यांकन केल्यानंतर इतर गाड्यांमध्येही ती बसवता येईल असं मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी आकाशवाणीला सांगितलं.