February 6, 2025 10:41 AM February 6, 2025 10:41 AM

views 12

क्रीडा विभागाचं कामकाज अधिक वेगाने होण्यासाठी एकात्मिक संगणक प्रणाली विकसित करण्याचे राज्य क्रीडामंत्र्यांचे निर्देश

क्रीडा विभागाचं कामकाज अधिक वेगानं होण्यासाठी एकात्मिक संगणक प्रणाली विकसित करण्याचे निर्देश राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल दिले. यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. अशी प्रणाली विकसित झाल्यावर खेळाडूंना योजनांचा लाभ वेळेत मिळेल. स्पर्धा आणि खेळाडूंच्या कामगिरीचा तपशील या एकत्रित प्रणाली अंतर्गत जतन करता येईल असं भरणे यांनी सांगितलं.