September 27, 2024 3:01 PM
25
हरित ऊर्जा क्षेत्रातील चार कंपन्यांसमवेत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या
कार्बन उत्सर्जन २०७० पर्यंत शून्य करण्याचं सरकारचं लक्ष्य आहे. राज्याचं नवीकरणीय ऊर्जेचं उत्पादन २०३० पर्यंत ५० टक्के करण्याच्या दिशेने सरकारनं सामंजस्य करार केल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली. मुंबईत काल हरित ऊर्जा क्षेत्रातल्या ४ कंपन्यांच्या सोबत सामंजस्य करार झाले. ४७ हजार ५०० कोटींच्या सामंजस्य करारामुळे १८ हजारांहून अधिक रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. याशिवाय जल विद्युत निर्मितीसाठीच्या पम्प्ड स्टोरेज प्रकल्पासाठी काल ३ कंपन्यांसोबत सामंजस्य करार...