June 13, 2025 2:14 PM June 13, 2025 2:14 PM
12
देशाच्या उत्तर भागात उष्णतेची लाट तर महाराष्ट्रासह दक्षिणेत मुसळधार पावसाचा इशारा
कर्नाटकात अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. किनारपट्टीलगतचा भाग, उत्तरेकडील बेळगावी, धारवाड, गडग, हावेरी, दक्षिण अंतर्गत प्रदेशातील चिकमंगलूर, कोडगू, शिवमोगा आणि दावणगिरी इथं जोरादार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. महाराष्ट्रातही पुणे कोल्हापूर सांगलीसह विविध जिल्ह्यात काल जोरदार पाऊस पडला. कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पुदुचेरी, कराईकल, गोवा आणि महाराष्ट्रात येत्या 24 तासात तुरळक ठिकाणी अतिजोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तुरळक ठिकाणी ताशी 60 ते70 किलोमीटर इतक्या वेगाने वारे वाहतील...