January 22, 2025 11:09 AM January 22, 2025 11:09 AM

views 6

धोरणात्मक भागीदारी वाढविण्यासाठी आपण लवकरच भारताला भेट देणार – उर्सुला वॉन डेर लेयन

भारत आणि अन्य काही देशांसोबत मुक्त व्यापार करारांमध्ये प्रगती होण्याची आपल्याला आशा असल्याचं जर्मनीचे चान्सलर ओलाफ शोल्झ यांनी म्हटलं आहे. दावोस इथं झालेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीत ते बोलत होते. धोरणात्मक भागीदारी वाढविण्यासाठी आपण लवकरच भारताला भेट देणार असल्याचं युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांनी सांगितलं.