October 21, 2024 8:35 AM October 21, 2024 8:35 AM
14
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीनं 99 उमेदवारांची आपली पहिली यादी आज जाहीर केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दक्षिण पश्चिम नागपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. कामठी मतदारसंघामधून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जामनेरमधून मंत्री गिरीश महाजन, तर बल्लारपूरमधून मंत्री सुधीर मुनगंटीवार निवडणूक लढवणार आहेत. या निवडणुकीसाठी भाजपानं काही विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. मुंबईत, वांद्रे पश्चिम मधून आशीष शेलार, मलबार हिलमधून मंगल प्रभात लोढा, कुलाब्यातून राह...