January 15, 2025 2:24 PM

views 11

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू, पक्षांचे नेते मतदारांपर्यंत पोहोचण्याचा करत आहेत प्रयत्न

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच सर्व पक्षांचे नेते मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपाचे परवेश वर्मा आणि रोहिणी गुप्ता हे आज नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. आपचे नेते मनिश सिसोदिया हे जंगपुरा मतदारसंघातून अर्ज दाखल करणार आहेत. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र यादव हेही आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.