August 27, 2024 8:29 PM August 27, 2024 8:29 PM

views 20

 बिहारमधून उपेंद्र कुशवाह आणि मनन कुमार मिश्रा यांची बिनविरोध निवड

 बिहारमधून, माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह आणि भाजपा उमेदवार मनन कुमार मिश्रा यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. या दोन जागांच्या पोटनिवडणुकीसाठी कुशवाह आणि मिश्रा या दोघांचेचं उमेदवारी अर्ज आले होते. आज उमेदवारी अर्ज मागं घेण्याचा शेवटचा दिवस होता. दोघांनीही अर्ज कायम ठेवल्यानं निकाल जाहीर करण्यात आला. कुशवाह हे राष्ट्रीय लोकमोर्चाचे अध्यक्ष असून, त्यांचा पक्ष भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी आहे.