February 7, 2025 2:17 PM February 7, 2025 2:17 PM

views 13

आर्थिक नियोजन आणि काटकसरीला प्राधान्य देताना कार्यक्षमतेत तडजोड होणार नाही याकडे लक्ष द्यावं – उपराष्ट्रपती

आर्थिक नियोजन आणि काटकसरीला प्राधान्य देताना कार्यक्षमतेत तडजोड होणार नाही याकडे लक्ष द्यावं असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सांगितलं आहे. भारतीय संरक्षण दल लेखा सेवेच्या नवनियुक्त अधिकाऱ्यांना काल नवी दिल्ली इथं ते संबोधित करत होते. सरकारी नोकरीत कायद्याचा आणि प्रामाणिकपणाचा मार्ग सर्वात सुरक्षित असल्याचं ते म्हणाले. सेवानिवृत्त सैनिकांच्या निवृत्तीवेतनाचं वितरण करताना सहानुभूतीचं धोरण ठेवावं, असा सल्ला त्यांनी या परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना दिला.

February 3, 2025 10:31 AM February 3, 2025 10:31 AM

views 11

देशात अवैधरित्या राहून राजकीय प्रक्रिया विस्कळीत करणाऱ्या परदेशी नागरिकांपासून सावध राहण्याचं उपराष्ट्रपतींचं आवाहन

देशात लाखोंच्या संख्येनं अवैधरित्या राहून राजकीय प्रक्रिया विस्कळीत करणाऱ्या परदेशी नागरिकांपासून सावध राहण्याचं आवाहन उपराष्ट्रपतीं जगदीप धनखड यांनी केलं आहे. अवैध प्रवासी नागरिक देशामध्ये राहणं धोकादायक असून, अशा परदेशी घुसखोरांना निवडणुकीच्या राजकारणावर प्रभाव पडण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, देशातल्या युवकांनी अशा राष्ट्र विरोधी घटकांचे वैचारिक मनसुबे हाणून पाडावे असं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं. नवी दिल्लीत भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या वतीने आयोजित परिषदेत ते काल बोलत होते...

January 13, 2025 2:23 PM January 13, 2025 2:23 PM

views 6

राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींनी लोहडी, मकर संक्रांत, पोंगल, माघ बिहू या सणानिमित्त देशवासीयांना दिल्या शुभेच्छा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज साजऱ्या होत असलेल्या लोहडी तसंच उद्या देशाच्या विविध भागात साजऱ्या होणाऱ्या मकर संक्रांत, पोंगल, माघ बिहू या सणानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतिक असणारे हे सण, सर्वांच्या जीवनात उत्साह आणि आनंद घेऊन येवोत, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. लोहडी आणि माघ बिहू निमित्त प्रज्वलित केला जाणाऱ्या अग्नीच्या पवित्र ज्वाला सगळ्यांच्या आयुष्यातील अडचणी दूर करतील आणि संक्रांतीनिमित्त आका...