November 11, 2024 2:13 PM November 11, 2024 2:13 PM

views 21

महायुती सत्तेत आल्यावर मुलींच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च सरकार करेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जाती-धर्माच्या प्रचाराला न भुलता विकासाचं राजकारण करणाऱ्यांना मत द्या असं आवाहन भाजपा नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. ते काल नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीच्या प्रचारसभेत बोलत होते. महायुती सत्तेत आल्यावर मुलींच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च सरकार करेल, असं आश्वासन यावेळी त्यांनी दिलं. वैद्यकीय महाविद्यालय, सर्कुलर बस, झोपडपट्टी पुनर्वसन करून महायुती सरकारनं विकास केल्याचं फडणवीस म्हणाले.

October 9, 2024 10:06 AM October 9, 2024 10:06 AM

views 15

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भीमा उजनी प्रकल्पा अंतर्गत देगाव शाखा कालव्याच्या कामांचं भूमिपूजन

भीमा उजनी प्रकल्पा अंतर्गत देगाव शाखा कालव्याच्या कामांचं भूमिपूजन काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. या कामासाठी 352 कोटी रुपये खर्च येणार असून याचा लाभ दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या दहा गावे आणि अक्कलकोट तालुक्यातल्या 25 गावांना होणार आहे. या प्रकल्पामुळे 16 हजार 129 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊन या भागातल्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार असल्याचं समाधान फडणवीस यांनी व्यक्त केलं.  

October 2, 2024 7:03 PM October 2, 2024 7:03 PM

views 19

राज्यातल्या धर्मादाय कार्यालयाचं काम कौतुकास्पद – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस

राज्यातल्या  धर्मादाय कार्यालयाचं काम कौतुकास्पद असून या विभागानं अधिकाधिक लोकाभिमुख कामं करावीत, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष, धर्मादाय रुग्ण योजनेसाठीची ऑनलाईन प्रणाली आणि रुग्णांकरता उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता हेल्पलाईनचं  उद्घाटन आज फडनवीस यांच्या हस्ते मुंबईत झालं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातल्या  शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सुविधा मोफत आणि सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी धर्मादाय संघटना आणि वैद्यकीय कक्ष समन्वयानं काम करत आह...

August 27, 2024 7:25 PM August 27, 2024 7:25 PM

views 16

नेपाळ बस दुर्घटनेतल्या जखमींना उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षामार्फत सर्वतोपरी मदत करणार

नेपाळ बस दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्णांना काल उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या मदतीने नेपाळहून मुंबईत आणण्यात आलं. यात भुसावळ तालुक्यातल्या वरणगाव इथल्या एकूण ७ जखमी प्रवाशांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी या जखमींची बॉम्बे रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. उद्या आणखी ४ जखमींना मुंबई आणण्यात येणार असून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत. या सर्व जखमींना उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षामार्फत सर्वतोपरी मदत केली जाणार आहे.

August 11, 2024 7:25 PM August 11, 2024 7:25 PM

views 28

विरोधकांच्या अपप्रचारामुळे भाजपाच्या जागा घटल्या, पण जनाधार घटला नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांचं मत

लोकसभा निवडणुकीच्या वेळी विरोधकांनी अपप्रचार केल्यानं भाजपाच्या जागा कमी आल्या, पण आपला जनाधार कमी झालेला नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. ते आज अकोल्यात भाजपाच्या जिल्हा विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते.  कुठल्याच बहिणीला लाडकी बहीण योजनेपासून वंचित ठेवण्यात येणार नाही. मात्र या  योजनेच्या यशाचा त्रास महाविकास आघाडीला होत आहे ते रोज लाडक्या बहिणीच्या संदर्भात खोटं बोलत आहेत असा आरोपही फडणवीस यांनी यावेळी केला. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आपल्या सरकारन...

July 3, 2024 7:57 PM July 3, 2024 7:57 PM

views 17

राज्याची अर्थव्यवस्था वेगानं वाढत असून गुंतवणुकीच्या बाबतीतही राज्य अग्रेसर आहे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस

राज्यपालांच्या अभिभाषणाच्या आभाराचा प्रस्ताव आज विधानपरिषदेनं एकमताने मंजूर केला. तत्पूर्वी, या प्रस्तावावर झालेल्या चर्चेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी उत्तर दिलं. राज्याची अर्थव्यवस्था वेगानं वाढत असून गुंतवणुकीच्या बाबतीतही राज्य अग्रेसर आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेनं अर्धा ट्रिलियन डॉलरचा टप्पा पार केला आहे आणि एक ट्रिलियन डॉलरचं ध्येय पुढच्या ३ ते ५ वर्षांत गाठण्याच्या दृष्टीनं मार्गदर्शक आराखडा तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. महायुती सरकारनं नोकरभरतीची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनं र...