August 19, 2024 6:33 PM

views 21

मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेऊ देत नसल्याचा जरांगे पाटील यांचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी फेटाळला

मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेऊ देत नसल्याचा मनोज जरांगे पाटील यांचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी फेटाळला आहे. मराठा आरक्षण तसंच सगेसोयऱ्यांच्या मुद्दयावर मुख्यमंत्री शिंदे यांना काम करायचं आहे, निर्णय घ्यायचा आहे मात्र त्यांना देवेंद्र फडनवीस काम करू देत नसल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. त्यावर फडनवीस यांनी आज बातमीदारांशी बोलताना उत्तर दिलं. मराठा समाजासाठी आजपर्यंत जे काही निर्णय झाले ते एक तर मी केले, किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्य...